आंदोलनाचा इशारा देणाऱ्या आमदार शहाजी पाटलांनी  मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर वाटले पेढे.. - Solapur Political Shiv Sena MLA Shahaji Patil celebrates after the decision of the Chief Minister  | Politics Marathi News - Sarkarnama

आंदोलनाचा इशारा देणाऱ्या आमदार शहाजी पाटलांनी  मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर वाटले पेढे..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 मे 2021

इंदापूरला पाणी वळवण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर  सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांनी वाटले पेढे आहेत.

सांगोला : उजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर पेढे वाटून आनंद साजरा केला. इंदापूरला पाणी वळवण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर  सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांनी वाटले पेढे आहेत. Solapur Political Shiv Sena MLA Shahaji Patil celebrates after the decision of the Chief Minister

उजनी धरणातून इंदापूर ला ५ टीएमसी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रद्द केला त्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी हा निर्णय रद्द झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला.शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली. त्यानंतर ५ टी एम सी पाण्याचा निर्णय रद्द झाला. आता सांगोला तालुक्यातील २२ गावसाठी उपयुक्त असलेली सिंचन योजना २० वर्षापासून रखडली आहे. ही योजना पूर्ण करण्याची मागणी सुद्धा शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

उजनी धरणातील पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा रक्तरंजित आंदोलन सुरू होईल असा इशारा शहाजी बापू पाटील यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता.  राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असून जिल्ह्याची नरडी दाबली.आघाडी सरकारचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत असल्याचा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला होता.  

...तर एका भरणेंसाठी सोलापूरचे तीन आमदार घरी बसले असते..

पुणे : सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापुरला वळविण्याचा निर्णय सोलापूरकरांच्या प्रचंड असंतोषामुळे राज्य सरकारला रद्द करावा लागला. निर्णय रद्द करण्याची भूमिका घेण्यामागे राष्ट्रवादीला कॉंग्रेसला वाटत असलेली निवडणुकीची भीती हे कारण असल्याची चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे.  एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे NCP केवळ दोन आमदार व संजय शिंदे Sanjay Shinde यांच्या रूपाने एक सहयोगी आमदार आहे. त्यामुळे इंदापुरात  दतात्रेय भरणे यांच्यासाठी सोलापूरमधील तीन जागांवर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून उजनीच्या पाण्याचा विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तुर्तास बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. केवळ सर्वेक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्यात इतक्या तीव्रतेने उमटली तर प्रत्यक्ष निर्णय झाला असता तर काय झाले असते याचा अंदाज या निमित्ताने निर्णय घेणाऱ्यांना आला असेल. २०१४ पर्यंत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी क्रॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. आज ती परिस्थिती नाही.  
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख