Socialism Marries P Mamata Banerjee In Tamil Nadu
Socialism Marries P Mamata Banerjee In Tamil Nadu

ममता बॅनर्जी अन् सोशॅलिझम बनले आयुष्यभराचे जोडीदार

तमिळनाडूतील सालेमध्ये हे लग्न साधेपणाने पार पडलं.

चेन्नई : पश्चिम बंगालच्या (West bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आणि डाव्या पक्षांमधील राजकीय भांडण सर्वश्रूत आहे. ममतादीदींनी बंगाल हा डाव्यांचा गड उध्वस्त केला आहे. पण ममता बॅनर्जी असं नाव असलेल्या मुलीने डाव्या पक्षाच्या नेत्याच्या सोशॅलिझम नावाच्या मुलाशी रविवारी केलेल्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Socialism Marries P Mamata Banerjee In Tamil Nadu)

तमिळनाडूतील सालेमध्ये हे लग्न साधेपणाने पार पडलं. वधूचं नाव पी. ममता बॅनर्जी आणि वराचं नाव ए. एम. सोशॅलिझम असं आहे. एका वृत्तपत्रात या दोघांच्या लग्नाची पत्रिका छापण्यात आल्यानंतर या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. ही लग्नपत्रिकाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यामुळं आजच्या लग्नाविषयी उत्सुकता होती. सालेम येथील कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ए. मोहन यांचा ए. एम. सोशॅलिझम हा मुलगा आहे.

ए. मोहन यांच्या दुसऱ्या दोन मुलांची नावं कम्युनिझम आणि लेनिनिझम अशी आहेत. त्यांच कुटूंब अनेक वर्षांपासून कम्युनिझमला मानणारे आहे. सोशॅलिझम यांचा विवाह होणारी मुलगी पी. ममता बॅनर्जीही मोहन यांचीच नातेवाईक आहे. तिच्या कुटूंब काँग्रेसचे समर्थक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं. ममता बॅनर्जी याही पूर्वी काँग्रेसमध्येच होत्या. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत हे नाव ठेवण्यात आल्याचे मोहन यांनी सांगितले. 

पी. ममता बॅनर्जी यांच्या नावाविषयी विचारले असतात त्या म्हणाल्या, मी दहावीमध्ये असताना या नावाविषयीचे महत्व कळाले. माझे मित्र याविषयी नेहमी बोलायचे. ममता बॅनर्जी यांना बातम्यांमध्ये अनेकदा पाहिलं आहे. त्या एक कणखर महिला आहेत. मला हे सांगताना अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदवी मिळवली आहे. 

सोशॅलिझम यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून ते एक व्यवसाय करतात. आम्ही एकत्र आल्याचा आनंद होत आहे. आनंद आणि दु:खाच्या प्रसंगीही आम्ही एकमेकांची साथ देऊ. काहीही झाले तरी आम्ही आयुष्यभर एकत्र असू, अशी भावना सोशॅलिझम यांनी व्यक्त केली. या लग्नाला तमिळनाडूचे सीपीआयचे प्रमुख आर. मुथारसन, खासदार के. सुब्बरायन यांच्यास डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com