मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॅारवर्ड करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण - Six arrested, including Shiv Sena branch chief  | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॅारवर्ड करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी या मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.

मुंबई : कांदिवली येथील सेवानिवृत्त नैादल अधिकारी मदन शर्मा (वय65) यांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन शाखाप्रमुखांचा समावेश आहे. मदन शर्मा यांनी आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे समजते. या मारहाणीत शर्मा याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी या मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. व्यंगचित्र फॅारवर्ड केल्याप्रकरणी आपल्या वडीलाना अनेक फोन येत होते. ते इमारतीबाहेर गेल्यानंतर त्यांना काही जणांनी मारहाण केली आहे, असा आरोप शर्मा यांची कन्या डॉ. शीला शर्मा यांनी केला आहे. 
 
मदन शर्मा हे कांदीवली पूर्व भागात राहतात. त्यांनी ‘महानगर -1’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुखमंत्री उद्वव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॅारवर्ड केलं होतं. ही बाब शिवसैनिकाना खडकल्यामुळे त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण केली असल्याचे समजते. हा प्रकार काल दुपारी घडला. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाखाप्रमुख कमलेश कदमसह त्यांच्यासोबत असलेल्या सहा जणांवर गुन्हा नोंदविला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. 

संजय शांताराम मांजरे ( वय 52 वर्षे), राकेश राजाराम बेळणेकर (वय 31), प्रताप मोतीरामजी सुंदवेरा (वय 45), सुनिल विष्णू देसाई (वय 42), राकेश कृष्णा मुळीक (वय 35) अशी अटक करण्यात आलेल्या अन्य जणांनी नावे आहेत. 

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही, असे टि्वट आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात, यांना भामटे नाही तर काय म्हणावं, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा :    "जमीन व्यवहारामुळे खडसेंवर राजीनाम्याची वेळ.." 
 
नवी दिल्ली : "माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मला त्रास दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. नाथाभाऊ वगळता सर्वांना त्यांनी स्वच्छ केले. माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री भेटत होते. पण मला वेळ देत नव्हते. कोण कोणाला रात्री भेटत होते, याचे सारे पुरावे आता माझ्याजवळ आहेत. त्यामुळे ते मी सारे पुस्तकात मांडणार आहे," असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. दिल्ली दैाऱ्यावर असलेले फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काल फडणवीस याचं नावं घेऊन खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकनाथ खडसे यांच्यावर माझ्यामुळे नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खडसेंना मनीष भंगाळे यांच्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदीव्यवहारामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आगामी पुस्तकाचे नाव जाहीर केले असून `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान`, या नावाने ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करणार आहेत. 
      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख