धक्कादायक ! २४ तासांत साडेतीन हजार जणांचा मृत्यू तर...  - Shocking! If three and a half thousand people die in 24 hours   | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक ! २४ तासांत साडेतीन हजार जणांचा मृत्यू तर... 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे.

मुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्ण सापडले असून, जणांचा मृत्यू झाला आहे. देशात प्रथमच एका दिवसात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो कोरोना रुग्णांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचे तांडवच सुरू आहे, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत. गेल्या २४ तासात देशात साडेतीन हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लस कंपन्यांना एका चेकने २५०० ते ३००० कोटी रुपयांची रक्कम देऊ...पण?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जात असते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली. २४ तासांत देशात ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत. 

पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का? शेळकेंच जशास तसे उत्तर
 

देशात दररोज ५,००० मृत्यू होणार?

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने भारतासाठी धक्कादायक इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, या अभ्यासाच्या आधारे दिला आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख