`भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन : जय भवानी! जय शिवाजी!!`

छत्रपतींच्या वंशजांचा राज्यसभेतअपमान झाल्याच्या कारणावरून सध्या महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे.
sanjay_raut_and_udayanraje
sanjay_raut_and_udayanraje

पुणे : राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार म्हणून काल ( बुधवार, ता. २२) शपथ घेतल्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे यांनी `जय महाराष्ट्र..जय भवानी...जय शिवाजी`अशी घोषणा दिली. अशा घोषणा देऊ नये, अशी तंबी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिली. यावर महाराष्ट्रातून नायडू यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नेटकऱ्यांनी विविध मार्गाने नायडू यांच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे.

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी देखील याबाबत एक ट्वीट करुन भाजपावर टिका केली आहे. राऊत ट्वीट मध्ये म्हणतात,‘‘ छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणा नाही...जय भवानी! जय शिवाजी!!

संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यात मध्यंतरी वाद झाला होता. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यानंतर साताऱ्याच्या गादीबद्दल राऊत यांनी काही प्रश्न विचारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याच्या पुराव्यांची मागणी राऊत यांनी केली होती. त्यावरून संभाजी भिडे यांनी `बंद`ची हाक दिली होती. त्याचा संदर्भ राऊत यांच्या ट्विटमागे आहे. उदयनराजे यांनीही राऊत यांना तिखट प्रश्न केले होते. राज्यसभेतील कालच्या प्रकारानंतर राऊत यांनी यानिमित्ताने भाजपला आणि भिडेंना ओरखडे काढले आहेत. 

नायडू यांनी उदयनराजे यांना समज देताना `हे माझे चेंबर आहे. हे घर नाही,"असे म्हटले. या घटनेमुळे राज्यभरात शिवप्रेमींl संताप उफाळला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वीस लाख पोस्टकार्ड त्या पोस्टकार्डवर 'जय शिवाजी, जय भवानी'असे लिहून नायडू यांना पाठवणार आहेत.

दरम्यान शरद पवार यांनी राममंदिर भूमिपुजनाबाबत वक्तव्य करताना राममंदिराच्या भुमिपुजनाने कोरोना जाणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर भाजपाने पवार यांच्यावर टिका केली होती. तर भाजपाच्या युवा आघाडीने ‘जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्र पवार यांच्या मुंबईच्या निवासस्थानी पाठविण्याचे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणुन राष्ट्रवादी युवा आघाडीकडुन व्यकंय्या नायडू यांनी ‘‘जय भवानी... जय शिवाजी...`` या घोषणेची २० लाख पत्र पाठविण्याचे आंदोलन छेडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com