नारायण राणेंना मिळालेलं खात त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही!  - ShivSena mp Sanjay Raut criticizes Narayan Rane   | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंना मिळालेलं खात त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

नारायण राणे यांना कुठलं खातं मिळते याची उत्सुकता सगळ्यांना होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्य टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार काल सायंकाळी पार पडला. या विस्तारात राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.  ShivSena mp Sanjay Raut criticizes Narayan Rane  

केंद्रीय कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना कुठलं खातं मिळते याची उत्सुकता सगळ्यांना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय मिळेल अशी चर्चा होती परंतु राणेंकडे आता  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री, भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री तर कपिल पाटिल यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातून या चार जणांचा समावेश मंत्रीमंडळात झाल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ''भारती पवार, कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राँडक्ट आहे. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मिळालेलं खात त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही." संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

'राष्ट्रवादी'त गेल्याने ''कुछ तो होनेवाला है'' असा मेसेज फिरत होताच..
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं काल समन्स बजावले आहे. ते ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीच्या कार्यालयात गेले आहे. ''ईडीला चैाकशीत पूर्ण सहकार्य करणार'' असे खडसेंनी सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते. खडसे म्हणाले की, भोसरी जमिन व्यवहारात मला जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकरणाला राजकीय वास येतो आहे. या चैाकशीच्या हेतूवरच मला संशय आहे. कारण काही दिवसापासून जळगाव येथील काही व्हाटअँपग्रुपवर ''कुछ तो होनेवाला है'' असा मेसेज काही दिवसापासून फिरतो आहे. याचा अर्थ असा आहे की, जाणीवपूर्वक ही चैाकशी केली जात आहे.  या सर्व प्रकरणाला राजकीय वास येत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मला आणि माझ्या परिवाराला छळण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख