शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन - shivsena ex mp mohan rawale passed away Politics news | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020

शिवसैनिकापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत मोहन रावले यांचा उत्तम संपर्क होता.  

मुंबई : शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ माजी खासदार मोहन रावले यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. दक्षिण मुंबईतुन सलग पाच वेळा ते खासदार होते. शिवसेनाप्रमुखांचे काही काळ अंगरक्षक देखील होते.  मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. दक्षिण मुंबईत शिवसेना वाढविण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसैनिकापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत मोहन रावले यांचा उत्तम संपर्क होता. गोव्यात काही कामानिमित्त ते गेले होते. त्यावेळी त्यांचं निधन झालं. 

मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आणलं जाणार आहे.दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून ते तब्बल पाच वेळा निवडुन आले होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबाग मध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले. त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते. 

दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्या नंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून ते तब्बल पाच वेळा निवडून आले होते.  

हेही वाचा : वसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार
 
मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली. या वेळी प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते. शासकीय निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. ही पदे मंजूर करताना केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निवासी शाळेसाठीच्या शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख