शिवसेनेनं पुन्हा काँग्रेसला डिवचलं; थेट राहुल गांधींवर साधला निशाणा

शिवसेनेकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका केली जात आहे.
Shivsena again criticize Congress leader Rahul Gandhi
Shivsena again criticize Congress leader Rahul Gandhi

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचा महाविकास आघाडी सरकार आहे. पण शिवसेनेकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका केली जात आहे. गुरूवारी पुन्हा एकदा शिवसेनेनं काँग्रेसला डिवचलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरून शिवसेनेनं थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. (Shivsena again criticize Congress leader Rahul Gandhi)

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंच नामक विरोध पक्ष गटाची एक बैठक झाली. भाजप विरोध किंवा मोदी विरोध हाच एकमेव समविचार असल्याने काही लोक त्यात सामील झाले. पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला. खरे तर मंगळवारी शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीत राहुल गांधी यांनी सुरू केले तर मरगळलेल्या विरोधी पक्षांच्या चेहऱ्यावर तरतरीत भाव दिसू लागतील, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीची राहिलेली नाही. ती घसरली आहे, पण त्या घसरलेल्या जागेवर सध्याचा विरोधी पक्ष वाढतोय, रुजतोय असे दिसत नाही. काही राज्यांतील निवडणुकांत विरोधी पक्षांचा विजय झाला. ती विजयाची सळसळही आता थंड झाली. दिल्लीत ठाण मांडून बसेल व देशातील समस्त विरोधी पक्षांशी समन्वय घडवे, अशी व्यवस्था तितक्या दिवसांत घडू शकलेली नाही. शरद पवार हे सर्व घडवू शकतात, पण पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो, असा टोला 'सामना'तून लगावण्यात आला आहे.

काँग्रेस अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे

काँग्रेसनं याकामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेस पक्ष स्वत:च गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे.  खरे म्हणजे काँगेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे. तरत विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीला खरे बळ प्राप्त होऊ शकेल, असे अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

राहुल गांधी केवळ ट्विटरच्या मैदानात 

राहुल गांधी हे मोदींच्या कार्यपध्दतीवर, त्यांच्या चुकांवर हल्ले करती आहेत, पण ते ट्विटरच्या मैदानावर. ट्विटर प्रकरण भारी पडत आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारने त्या ट्विटरच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली. पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदललेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून आपले नियंत्रण राहिलेले नाही हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसतं, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

युपीए नावाजी संघटना आहे. पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचचे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी राष्ट्रमंचवाल्यांचे आभार मानायला हरकत नाही, असे म्हणत काँग्रेसला डिवचलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com