शिवराज सिंह चैाहान यांचे सोनिया गांधींना पत्र..कमलनाथ यांच्यावर कारवाई करा... - Shivraj Singh Chaihan letter to Sonia Gandhi take action against Kamal Nath  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवराज सिंह चैाहान यांचे सोनिया गांधींना पत्र..कमलनाथ यांच्यावर कारवाई करा...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

कमलनाथ यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवराज सिंह चैाहान यांनी दोन तासांचे मैान व्रत धारण केले होते.

भोपाल : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यमंत्री इमरती देवी यांच्यावर केलेल्या व्यक्तव्यावरून मुख्यमंत्री शिवराजसिंह चैाहान यांनी काँग्रेसवर निशाना साधला आहे. याबाबत शिवराज सिंह चैाहान यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे. कमलनाथ यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवराज सिंह चैाहान यांनी दोन तासांचे मैान व्रत धारण केले होते.

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री चैाहान म्हणतात की विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यमंत्री इमरती देवी यांच्याबाबत अशोभनीय असे वाईट व्यक्तव्य केले आहे. ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. मला असे वाटले की आपण एका महिलेविषयी केलेल्या व्यक्तव्याबाबत कठोर कारवाई करणार, पण अद्यापपर्यंत आपण काहीही कारवाई केलेली दिसत नाही. 

मुख्यमंत्री शिवराजसिंह चैाहान यांनी सांगितले की कमलनाथ यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडील पक्षाचे सर्व पदभार काढून टाकावे. त्यांना पदावरून हटविताना समज द्यावी, जेणेकरून महिलांचा अपमान करणाऱ्या तुमच्या काँग्रेसमधील अन्य नेत्यांना त्यापासून शिकवण मिळेल.  

कमलनाथ यांच्या या व्यक्तव्यानंतर तुम्ही मैान व्रत धारण करू नये. जर तुम्ही जर मैान व्रत धारण केले तर दलित मंत्री इमरती देवी यांच्यावर केलेल्या विधानाशी आपण सहमत आहात, असे आम्ही समजू, असे शिवराज सिंह चैाहान यांनी स्पष्ट केलं आहे. सोनिया गांधी यांना पाठविलेले पत्र शिवराजसिंह चैाहाऩ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. 
 

हेही वाचा : राहुल गांधी नव्हे; हे तर राहुल लाहोरी : संबित पात्रांची कडवट टीका  
नवी दिल्ली : पाकिस्तानातील वेब संवादात भारताची प्रतिमा खराब करणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे नेते असलेले राहुल गांधी हे पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार आहेत का? असा तिखट सवाल भाजपने आज (ता. 18 ऑक्‍टोबर) विचारला. हे असेच चालू राहिले, तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये परावर्तित होईल, अशी टीका करताना सत्तारूढ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींचा उल्लेख राहुल लाहोरी असा उपरोधिकपणे केला. शशी थरुर यांनी नुकतेच पाकिस्तानातील संवादात बोलताना ईशान्य भारतीयांना उर्वरित देशात मिळणारी वागणूक तसेच तबलिगी जमातीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे भाजपचा संताप झाला. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे थरुर हे उजवे हात मानले जातात, तेव्हा त्यांची भूमिका या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का आणि तसे असेल तर राहुल गांधी पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार का? असे सवाल पत्रा यांनी विचारले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख