अरे बापरे..पोलिसानेच केले अडीच किलो सोने लंपास.. - Shivdi The gold was stolen Mumbai police | Politics Marathi News - Sarkarnama

अरे बापरे..पोलिसानेच केले अडीच किलो सोने लंपास..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

सोने व्यापाऱ्याचे अडीच किलो सोने लंपास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

भायखळा (मुंबई) : कुंपणाने शेत खाल्ले तर दाद कुणाकडं मागायची, रक्षणकर्तेच जर चोर निघाले तर, न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न भायखळा येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता खरे पोलिसही  सहभागी झाल्याची घटना घडली आहे. Shivdi The gold was stolen Mumbai police

मुंबईतील भायखळा येथे एका सोने व्यापाऱ्याचे अडीच किलो सोने लंपास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका खऱ्या पोलिसाचा समावेश आहे. खलील शेख असं या पोलिसाचे नाव असून तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.

शिवडीतील सोनेव्यापारी भरत जैन हे मित्र मिलेश कांबळे याच्यासोबत ३१ मे रोजी दुचाकीवरून येत असताना काही पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवली. वाहनाची कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने या पोलिसांनी त्यांच्या बॅगेचीही झाडाझडती घेतली. बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे पाहून याची पोलिस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून सोने घेऊन गेले ते पुन्हा परतलेच नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकीचे नंबर मिळाले. या नंबरवरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर भायखळा पोलिसांनी जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला पकडले. मिलेशने दिलेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

'अॅलोपॅथी'वर टीका करणाऱ्या रामदेव बाबांच्याविरोधात याचिका दाखल.. 

नवी दिल्ली  : अॅलोपथी औषध, आणि डॉक्टरांवर टीका करून डॉक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान करणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात 
देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  अनेक राजकारणी, बॉलिवूड स्टार आणि परदेशातील व्यक्तींविरोधात याचिका दाखल करणारे करून ज्ञान प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ज्ञान प्रकाश यांचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. रामदेव बाबा यांचे म्हणणे फसवे असल्याचे ज्ञान प्रकाश यांनी याचिकेत  म्हटलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याव्यतिरिक्त देशद्रोह आणि फसवणुकीसंबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ता. 7 जून रोजी होणार आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख