वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले...शिवसेनेचा भाजपला टोला 

एका बाजूला बोंबलायचे, सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून टीका करायची. त्याच वेळी असे नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा.
4Devendra_20Fadanavis_20_20Uddhav_20Thackeray_20_20Sanjay_20Raut.jpg
4Devendra_20Fadanavis_20_20Uddhav_20Thackeray_20_20Sanjay_20Raut.jpg

मुंबई :राज्य सरकारच्या विरोधात विविध विषयावरून भाजप आंदोलने करीत आहेत. रस्त्यावर उतरत आहे. यावरून शिवसेनेने भाजपला फटकारले आहे. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ”हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?” त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे. भाजपला महामारीची उपमा देत लोकांच्या जिवाशी का खेळता? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत.

आताही भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढते आहे याचे भान तरी त्यांनी ठेवावे, असे अग्रलेखात म्हटले आहे. 

एका बाजूला बोंबलायचे, सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून टीका करायची. त्याच वेळी असे नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ येत आहे, पण भाजपला वाटत आहे ही लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरवू. आम्ही म्हणतो ठीक आहे. तुमचे राजकारण तुमच्यापाशी, पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता? कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असेल तर ती धोक्याची घंटा सगळय़ांसाठीच आहे, असे अग्रलेखात स्पष्ट केलं आहे. 

  1. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांनी समजून घ्यावे.
  2. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय?
  3. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? ‘कोरोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय.  (Edited  by : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com