शिवसेना आता कन्हैयाकुमार, उमर खालिद यांच्या विचारावर... भातखळकरांचा टोला - Shiv Sena now on the thoughts of Kanhaiyakumar, Umar Khalid  Criticism of Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना आता कन्हैयाकुमार, उमर खालिद यांच्या विचारावर... भातखळकरांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

किशोरी पेडणेकर यांच्या विधानावरून भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वट करून पेडणेकर व शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबई : लव्ह जिहाद वरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला आहे. मुंबई येथे आज महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना वाढला, या माझ्या विधानाचा भाजपकडून विपर्यास करण्यात आला आहे. मी केवळ प्रार्थनास्थळे म्हटले नाही तर बारमध्ये जाण्यानेही कोरोना वाढला. लोक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातला आहे. 

भाजप यावरुन केवळ शब्दांचा खेळ करत आहे. लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे., अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी केली. लव्ह जिहाद (Love Jihad) कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले आहे. 

किशोरी पेडणेकर यांच्या या विधानावरून भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वट करून पेडणेकर व शिवसेनेवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा  निश्चिय केलेला दिसतोय... हा आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद...

संबंधित लेख