राजकीय गांजाडयांना मराठी माणूस चोपलयाशिवाय राहणार नाही!

प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुकवरून याविषयीचे स्पष्टीकरण दिले.
 Sanjay Raut, Prasad Lad .jpg
Sanjay Raut, Prasad Lad .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना (ShivSena) भवनासंदर्भात केलेले विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव करत सगळे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. आपण असे कोणतेही वक्तव्य केलेले नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचे लाड म्हणाले आहेत. शनिवारी रात्री यासंदर्भाले त्यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांच्यावर निराणा साधला आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Prasad Lad) 

राऊत यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?

लाड काय म्हणाले...
 
प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुकवरून याविषयीचे स्पष्टीकरण दिले. ''प्रसारमाध्यमांतून माझ्या भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. मात्र, मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही'' असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आपल्याला काय म्हणायचे होते, याबाबत लाड यांनी दावा केला आहे. ''माझे असे म्हणणे होते की आम्ही माहीममध्ये येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या वाक्याचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आले आहे, त्यावर माझे हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता'' असे लाड यांनी म्हटले आहे.

आपल्या विधानाबद्दल प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ''जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असेही ते म्हणाले आहेत.पण, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल असे देखील लाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com