राज्यपालांची प्रतिमा चांगली हवी..संवैधानिक पदाचा दुरूपयोग करू नये : संजय राऊत

"संवैधानिक पदाचा कोणीही दुरूपयोग करू नये," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
0raut_20koshyari.jpg
0raut_20koshyari.jpg

मुंबई : "भगतसिंह कोश्यारी आज महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ते कालपर्यंत संघप्रचारक होते, संवैधानिक पदाचा कोणीही दुरूपयोग करू नये," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत आज पत्रकारांशी बोलत होते.  

राऊत म्हणाले, "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालनियुक्त बारा आमदारांची नावांना अद्याप मंजूरी दिलेली नाही. राज्यपालांची प्रतिमा ही चांगली असली पाहिजे. संवैधानिक पदाचा कोणीही दुरूपयोग करू नये."  

पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहसचिवांना दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर आज सकाळी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याबाबतची मागणी त्यांच्याकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या अहवालावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बदली रॅकेटमध्ये सरकारमधील काही मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर सत्ताधारी पक्षातीने त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

शुक्ला यांचा अहवालच कोटा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. त्यांनी सत्ता स्थापनेवेळीही बेकायदेशीरपणे नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. तर फडणवीस यांनी काल हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केला. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकार तशी चौकशी करू शकते, असे आपले मत आहे. असे असले तरी याप्रकरणी वेळ आली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. काल दिल्लीतून परतल्यानंतर आज फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काही दिवसांपासून केली जात आहे. खासदार गिरीश बापट यांनीही लोकसभेत ही मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com