चंद्रकांतदादा, हिमंत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा.. - Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

चंद्रकांतदादा, हिमंत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे तर त्यांना मी पिंजऱयात येण्याचं आमंत्रण देतो.

नंदुरबार : "आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता ; तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे," अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी युतीच्या प्रश्नावर नामोल्लेख टाळत नुकतेच उत्तर दिले. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज चंद्रकांतदादांना प्रतित्युत्तर देत टोला लगावला आहे.Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Chandrakant Patil  

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर संजय राऊत म्हणाले, "चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेवू नका."  राऊत नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 
संजय राऊत म्हणाले, "चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे तर त्यांना मी पिंजऱयात येण्याचं आमंत्रण देतो. हिमंत असेल तर  वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा."  राऊत म्हणाले, "कॅाग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे त्यांना 'सामना'मधून काँग्रेसने संघटना मजबूत करण्यासाठी सांगितलं आहे. कारण विरोधी पक्षानं अधिक मजबूत असावं."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की,  त्यात राजकारण करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील रखडलेल्या मुद्यांवर ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. तो राजशिष्टाचाराचा एक भाग आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्यांची आता काही भूमिका राहिलेली नाही. आता जे काही करायचे आहे ते केंद्रालाच करावे लागेल म्हणून ठाकरेंनी मोदींची भेट घेतली. 
 
पुन्हा मजबूत बनण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेचा सल्ला.. 

मुंबई : कॅाग्रेस सध्या विविध संकटाचा सामना करीत आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेने सल्ला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आले आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.  अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असे अग्रलेखात म्हटलं आहे.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख