शिवसेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर...म्हणाले,  ''एक कोटी देतो रेमडेसिविर द्या...'' - Shiv Sena MLA Sanjay Gaikwad criticizes Thackeray government Remdesivir | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर...म्हणाले,  ''एक कोटी देतो रेमडेसिविर द्या...''

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी वणवण फिरत आहे. 

बुलढाणा : राज्यात रेडमेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक हतबल होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी वणवण फिरत आहे. 
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत संताप व्यक्त करुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे रुग्नांच्या मृत्यू दरात वाढ झालेली आहे.

याबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शनसाठी वणवण फिरत असताना त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही, मात्र एजंटाकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत. हा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो रुग्णानांचे जीव तरी वाचतील.

संतप्त प्रतिक्रिया देत आमदार संजय गायकवाड यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. बुलढाणा जिल्हा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख