शिवसेना भवनाला हात लावणे म्हणजे; फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्प आहे का?

आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणुक जिंकले आहेत.
  Rajan Salvi, Prasad Lad  .jpg
Rajan Salvi, Prasad Lad .jpg

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड  (Prasad Lad) यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद रंगला आहे. त्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. शिसेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. (Shiv Sena MLA Rajan Salvi criticizes Prasad Lad) 

या संदर्भात साळवी यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणले की ''शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणा-यांचे थोबाड फोडू. शिवसेना भवनाला हात लावणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतके सोप्प आहे असे काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचे मंदिर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे.''

''आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणुक जिंकले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही. प्रसाद लाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देवुन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावुन दाखवा. आमचे शिवसैनिक तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ''अशा शब्दात साळवी यांनी लाड यांचा समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

भाजपची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिले. कारण, त्यावेळी जी भाजप होती, भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील आपल्या सोबत आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच जास्त येतात. फक्त त्यांना सांगायचे की वर्दी घालून पाठवू नका, त्यामुळे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती आमची की त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू'', असे लाड म्हणाले होते.  

दरम्यान, आपल्याला काय म्हणायचे होते, याबाबत लाड यांनी दावा केला आहे. ''माझे असे म्हणणे होते की आम्ही माहीममध्ये येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या वाक्याचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आले आहे, त्यावर माझे हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता'' असे लाड यांनी म्हटले आहे.

आपल्या विधानाबद्दल प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ''जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असेही ते म्हणाले आहेत. पण, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल असे देखील लाड यांनी स्पष्ट केले. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com