योगींचे स्वागतच..पण मुंबईतले उद्योग पळविणे कोणाच्या बापाला शक्य नाही...

शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांना लक्ष केले आहे.
3Yogi_20Adityanath_20Sanjay_20Raut.jpg
3Yogi_20Adityanath_20Sanjay_20Raut.jpg

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी योगी आदि्त्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईतील काही कलाकार, उद्योगपतीशी याबाबत चर्चा केली. यावरून शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांना लक्ष केले आहे. 

बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला आहे. 

योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असा सल्ला 'सामना'तून देण्यात आला आहे. 

योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार?, असा सवाल शिवसेनेचे उपस्थित केला आहे. 

मुंबईला का ओरबाडता? 
उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार? मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय? उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबाडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय? उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 व 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com