छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत..शिवसेनेची टिका - Shiv Sena criticizes BJP over petrol diesel price hike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत..शिवसेनेची टिका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे. त्यावर कोणताही उपाय सरकार करताना दिसत नाही.

मुंबई : पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रोज महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणं कठिण होत चाललं आहे. या विषयावर आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. एकेकाळी महागाईवर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर 'सामना'तून टिकास्त्र सोडण्यात आले आहे. Shiv Sena criticizes BJP over petrol diesel price hike

पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलांपर्यंत, बियाणांपासून खतांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाही, असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. 

महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे. त्यावर मांड ठोकून लगाम ओढण्याचा कोणताही उपाय सरकार करताना दिसत नाही. छोटा उतारा म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढविण्याचा ताजा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  1. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई थोडीशी कमी झाली, असा दावा सरकारच्या ताज्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्यावर विश्वास कोण ठेवणार?
  2. कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे.
  3. केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र, सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही.  उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख