भाजप नेत्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नये याचे आश्चर्य वाटते! - Shiv Sena criticism of BJP from Ashadi Wari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजप नेत्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नये याचे आश्चर्य वाटते!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

वारीसाठी आंदोलन घडवणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचे हे अघोरी प्रकार आहेत, अशी टिका शिवसेनेने भाजपवर केली आहे, 

मुंबई : येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशीचा  Ashadi Wari सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य सरकारने आषाढी पायी पालखी सोहळा व पंढरपूरची  Pandharpur यात्रा रद्द केली. आषाढीची श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला भाजपसह BJP विविध वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने शिवसेनेचे Shiv Sena मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून भाजपवर टीका केली आहे. 'वारकरी संप्रदायातील काही लोकांना हाताशी धरून वारीसाठी आंदोलन घडवणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचे हे अघोरी प्रकार' असा आरोप'सामना'तून भाजपवर केला आहे.

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला यातून महाराष्ट्रातील भाजपचे नेते काही शिकणार आहेत का? श्रद्धा आणि भावनिक विचार करून महाराष्ट्र सरकारने पंढरपूरच्या वारीत परवानगी दिली असती तरी सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप केला असता. सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे, पंतप्रधान मोदी सांगत आहे तरी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नये याचे आश्चर्य वाटते, असा टोला अग्रलेखात लगावला आहे. 

 

  • पंढरपूर प्रमाणे उत्तरप्रदेशात कावड यात्रेला महत्व आहे. 'कावड यात्रेला परवानगी द्या नाही तर आंदोलन करू' अशा धमक्या भाजपचे लोक देणार आहेत काय? ही धमकी एकतर सुप्रीम कोर्टाला असेल नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना असेल. 
  • कावड यात्रेत हिंदूंच्या भावना गुंतलेल्या आहेत पण निर्बंध तोडून हरिद्वारला गर्दी केली तर गंगामाता कोपल्या शिवाय राहणार नाही. याच गंगा मातेने हजारो कोरोनाग्रस्तांची प्रेत पोटात घेऊन अश्रू ढाळले आहेत.
  • कावड यात्रा असो वा पंढरपूरची यात्रा भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबारात राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल. भाजपला लोकांची डोकी भडकावून फक्त राजकारण करायचं आहे
  • गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहत राहवेत अशी त्यांची भावना असेल तर आशा लोकांवर गंगामैयाचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही

मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारलं ; भाजपसह वारकऱ्यांचा विरोध 
पंढरपूर : आषाढीचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. मानाच्या दहा पालख्यातील ४०० भाविकांना वारीसाठी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रथा आणि परंपराचे जतन करत यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख