इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च ; काश्मिर प्रश्नांवरुन पाकिस्तानवर हल्लाबोल

इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली
0Sarkarnama_20Banner_20_202021_04_30T122353.624 - Copy.jpg
0Sarkarnama_20Banner_20_202021_04_30T122353.624 - Copy.jpg

मुंबई : काश्मिरप्रश्नावरुन आजच्या  'सामना 'च्या अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.  पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले, असा टोला  'सामना'च्या अग्रलेखातून इम्रान खान यांना लगावला आहे. Shiv Sena attacks Pakistan over Kashmir issue

अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार काश्मिर प्रश्न सुटावा या पाकच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल? अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. पण हिंदुस्थानसाठी काश्मिर हा प्रश्न कुठे आहे?, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

इम्रान खान यांना अचानक कश्मीर प्रश्नाची उबळ आली आहे. कश्मीर प्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरजच उरणार नाही, असा साक्षात्कार इम्रान यांना झाला आहे. अर्थात, त्यातही त्यांचे वाकडे शेपूट वळवळलेच आहे. नेहमीप्रमाणे इम्रान यांनी त्यात अमेरिकेचे नाक ओढूनताणून खुपसलेच आहे. अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो, असे इम्रान महाशय म्हणाले आहेत. मुळात कश्मीरविषयी अमेरिकेसारख्या तिसऱ्या देशाचा संबंध येतोच कोठे? असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

काय म्हटल आहे सामनाच्या अग्रलेखात..
    
अमेरिका जागतिक महासत्ता वगैरे असेलही, पण म्हणून कश्मीरबाबत मध्यस्थी करण्याचा अधिकार तिला आहे असे होत नाही. खरे म्हणजे कश्मीर हा हिंदुस्थानसाठी मुद्दाच नाही. त्यामुळे तो ‘प्रश्न’ वगैरे देखील नाही. तरी पाकिस्तानकडून नेहमीच कश्मीरबाबत ‘तिसऱ्या’च्या मध्यस्थीची वकिली केली जात असते. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी यापूर्वी वरकरणी का होईना, तटस्थ भूमिका घेतली आहे. भले ते त्यांचे दाखवायचे दात असतील, पण तशी जाहीर भूमिका त्यांना घ्यावी लागली आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे अमेरिकेच्या मध्यस्थीचे तुणतुणे थांबलेले नाही. पुन्हा अमेरिकेने डोळे वटारू नयेत यासाठी अमेरिकेची इच्छा आणि संकल्पाच्या तारादेखील छेडल्या आहेत. पाकड्यांचे हे पूर्वापार राजकीय आणि लष्करी धोरण आहे. तेथे राष्ट्रप्रमुख किंवा लष्करप्रमुख कोणीही असला तरी या धोरणात बदल होत नाही. कारण ‘कश्मीर’ ही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांच्यासाठी सोयीनुसार वापरता येणारी ढाल आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्याच ‘गरजे’पोटी कश्मीरची ढाल पुढे केली आहे. सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी कश्मीर प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे, असे म्हटले होते. आता पुन्हा त्यांना या प्रश्नाचा ‘कळवळा’ आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com