शेलारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवू नये.. - Shelar should not decide the Chief Ministerial candidate of Mahavikas Aghadi. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

शेलारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवू नये..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

परब म्हणाले, ''भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा.''

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी 'मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी..' असं मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी शेलारांवर टीकास्त्र सोडले आहे. 

पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, ''भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा.''  राज्यपालनियुक्त जागांबाबत पत्रकारांनी विचारले असता  अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्रीपदी आल्यास माझा पाठिंबा असेल, या वक्तव्यावरून राजकीय धुरळा उडवून देणारे भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरून आता सारवासारव केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवरील पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात मी त्यावर बोललो. सर्व समाजातील स्त्रियांना उचित आणि सर्वोच्च स्थान मिळायला हवे, याच मताचा मी आहे. पुस्तकापुरताच हा विषय होता. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी  देवेंद्र फडणवीसच असतील. मी अजूनही क्षमतावान नाही, छोटा कार्यकर्ता आहे. सत्ता आली तर देवेंद्रच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शेलार यांच्या कालच्या वक्तव्यावरून वेगळीच चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले गेले. त्यात शेलार यांचा देवेंद्र फडणवीस यांना विरोध आहे की काय, अशीही कुजबूज सुरू झाली. त्यावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुंबई महापालिकेत भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून अतुल भातखळकर यांची नियुक्ती केली. त्यावर विचारले असता शेलार म्हणाले की आम्ही एकत्रित काम करु. भाजपात निर्णय सामूहिक होत असतात. मीही चर्चेत असतो.

 
शाळा सुरु करण्याचे सरकाचे षड्यंत्र ; शिक्षकांचा आरोप.

बुलढाणा : जिल्ह्यात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शाळा सुरु होणार आहेत, असे आदेश सुद्धा जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. शाळा सुरु करण्यामागे  सरकारच षडयंत्र आहे, असे काही शिक्षकांना वाटत आहे. अमरावती व पुणे विभागात शिक्षक आमदार निवडणूक असल्याने उमेदवाराना शिक्षक मतदारांना भेटता येत नाही, शिक्षक मतदार हे घरी असल्याने प्रत्येक मतदाराला भेटने शक्य नसल्याने,  सरकार ने शाळा सुरु करून शिक्षकाना शाळेत बोलावून या निवडणुकीत प्रचार सोपा जावा, उमेदवाराना शिक्षक मतदाराला एकाच ठिकाणी भेटता यावे, यासाठी अमरावती व पुणे विभागातील शाळा सुरु करण्याचा घाट सरकारने चालविला, तर राज्यात अनेक जिल्ह्यात शेकडो शिक्षक कोरोनाबाधित आढळत असताना शाळा सुरु करून सरकार "रिस्क" घेत असल्याचं काही शिक्षकाना वाटत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख