''मायबाप सरकार, मंदिरं उघडा नाही तर आमच्यावर बॉम्ब टाका..''   - Shegaon Vendors demand opening of temple Gajanan Maharaj | Politics Marathi News - Sarkarnama

''मायबाप सरकार, मंदिरं उघडा नाही तर आमच्यावर बॉम्ब टाका..''  

संजय जाधव
बुधवार, 2 जून 2021

मंदिरासमोर व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्यासमोर जगावं कसे असा प्रश्न उभा राहिला आहे.

शेगाव (बुलढाणा) : लॅाकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून सर्व मंदिरं बंद आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाहेर आपलं पोट भरणारे आता अडचणीत सापडले आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. Shegaon Vendors demand opening of temple Gajanan Maharaj

छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आता लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. अशाच एका मंदिराच्या बाहेर हळदी कुंकू विक्री करणाऱ्या आज्जीबाईंच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी ''आता मंदिर उघडत नसाल तर सरकारने आमच्यासारख्या गरिबांवर एखादा बॉम्ब गोळा टाकून आम्हाला मारा, किंवा आम्हा विष पाजा,'' अशी  प्रतिक्रिया दिली.  

मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून लेटरहेड का वाया घालवतात. 

लोकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. मात्र, मंदिरासमोर बसून विविध व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्याचे ही मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे जगावं कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील शेगांवचे गजानन महाराज मंदिर सध्या लोकडाऊन मुळे बंद आहे.  तर याठिकाणी मंदिराच्या बाहेर आपली छोटीमोठी दुकाने थाटून असणाऱ्या आणि त्यावर आपला घरसंसार चालवणाऱ्या फुल विक्रेता, मिठाई विक्रेता, खेळणी विकणारे, हॉटेल व्यावसायिक, भिकारी इतर व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.  त्यांना जगावं कसे हेच समजत नाही. तर हातावर पोट भरणारे हे तर सायंकाळची जेवणाची व्यवस्था कशी होईल, या चिंतेत आहे.  

''कोरोना विरोणा काहीच नसून हे नाटक आहे. माझी 6 मुलं मंदिरासमोर बसून आपला व्यवसाय करतात आणि आपली उपजीविका करतात.. मात्र आता त्यांची सुद्धा दुकाने बंद आहेत. 15 महिने झाले  आम्हाला कोरोना झाला नाहीय, आम्ही तर इथेच आहोत. दररोज ग्राहक येत असतात.  कोरोना हे फक्त षडयंत्र आहे,'' असे कुंकु विकणाऱ्या आजींनी सांगितलं.  ''मंदिर बंद असल्याने व्यापारी वर्गाचेही आर्थिक नुकसान होत आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे,'' असे व्यापारी शेखर नागपाल यांनी सांगितलं.  
Edited by : Mangesh Mahale    
   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख