उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार? शरद पवार म्हणाले...

आम्ही सगळेच दौरे करायला लागलो तर शासकीय यंत्रणेवर दबाव येतो.
 Sharad Pawar, Uddhav Thackeray .jpg
Sharad Pawar, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख वाटतात हे त्यांचे यश आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत असे सांगत उद्धव ठाकरे त्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar's reaction about Chief Minister Uddhav Thackeray) 

पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'वेलफेअर ट्रस्टच्या' माध्यमातून मदत जाहीर केली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ''आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचे समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे''.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि लोकांना धिर देण्यासाठी दौरे केलेच पाहिजे. शासकीय यंत्रणा, कार्यकर्ते हे पूरग्रस्तांना  मदतकार्य करत आहेत. त्यामुळे माझे आवाहन आहे की मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, कारण नसताना दौरे करुन, अडचण निर्माण करुन नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

यावेळी पवार म्हणाले, आम्ही सगळेच दौरे करायला लागलो तर शासकीय यंत्रणेवर दबाव येतो. त्यामुळे काम थांबते. माझ्यासारख्यानी दौरे टाळावे असे मला वाटते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्या विषयी विचारले असता पवार म्हणले, राज्यपाल हे केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळून देतील. राज्यपाल यांच्या दौऱ्यात भाजपचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे नाहीत त्यावर पवार म्हणाले, त्यांना ज्याच्यावर विश्वास आहे, त्यांना नेले असेल. 

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. सात जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार मदतीचे धोरण जाहीर करेल. पूरस्थितीचा अहवाल तयार करत अंतिम धोरण राज्यसरकार जाहीर करणार आहे. माळिनमध्ये अशी घटना घडली होती. माळिनचे पुनर्वसन करत राज्य सरकारने आदर्श निर्माण केला होता, असेही पवार यांनी सांगितले. 16 हजार कुटुंब उद्धस्त झाल्याची माहिती आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले आहेत. राष्ट्रवादीकडून 16 हजार किट तयार करण्यात आल्या आहेत. घरगुती भांडी, अंथरूण, मास्क, त्यामध्ये असेल, ही मदत स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून दोन दिवसात पोहचवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com