विनाकारण दौरे करणाऱ्यांचे शरद पवारांनी टोचले कान 

राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना मोठी मदत
विनाकारण दौरे करणाऱ्यांचे शरद पवारांनी टोचले कान 
Sharad Pawar .jpg

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि लोकांना धिर देण्यासाठी दौरे केलेच पाहिजे. शासकीय यंत्रणा, कार्यकर्ते हे पूरग्रस्तांना (flood affected areas) मदतकार्य करत आहेत. त्यामुळे माझे आवाहन आहे की मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, कारण नसताना दौरे करुन, अडचण निर्माण करुन नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (Sharad Pawar said that NCP will help 16,000 families in the flood affected areas) 

राष्ट्रवादीच्या वेलफेअर संस्थेच्या वतीने पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना जीवानावश्यक वस्तूंचे किंट वाटप करण्यात येणार आहे. त्याची माहिती पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे,अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. 

यावेळी पवार म्हणाले, आम्ही सगळेच दौरे करायला लागलो तर शासकीय यंत्रणेवर दबाव येतो. त्यामुळे काम थांबते. माझ्यासारख्यानी दौरे टाळावे असे मला वाटते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्या विषयी विचारले असता पवार म्हणले, राज्यपाल हे केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळून देतील. राज्यपाल यांच्या दौऱ्यात भाजपचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे नाहीत त्यावर पवार म्हणाले, त्यांना ज्याच्यावर विश्वास आहे, त्यांना नेले असेल. 

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. सात जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार मदतीचे धोरण जाहीर करेल. पूरस्थितीचा अहवाल तयार करत अंतिम धोरण राज्यसरकार जाहीर करणार आहे. माळिनमध्ये अशी घटना घडली होती. माळिनचे पुनर्वसन करत राज्य सरकारने आदर्श निर्माण केला होता, असेही पवार यांनी सांगितले. 16 हजार कुटुंब उद्धस्त झाल्याची माहिती आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले आहेत. राष्ट्रवादीकडून 16 हजार किट तयार करण्यात आल्या आहेत. घरगुती भांडी, अंथरूण, मास्क, त्यामध्ये असेल, ही मदत स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून दोन दिवसात पोहचवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच पूरग्रस्त भागात वैद्यकीय किट, आणि 250 डॉक्टरांची टीम वैद्यकीय सेवा देणार आहे. वैद्यकीय पथकांच्या मार्फत औषध पुरवले जाणार आहे. दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहचेल. राष्ट्रवादीच्या वतीने सध्या अडीच कोटींची मदत देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते व्यक्तिगत मदत करत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री यांनी डोंगर भागात असलेल्या गावांबाबत काल बैठक घेतली आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूरग्रस्त भागांबाबत काय नियोजन करायचे हे ठरवले जाईल. काल मुख्यमंत्री यांनी मला हे सांगितले. नदीच्या धोक्याच्या रेषेच्याआत बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. दोन तीन दिवसांत संपूर्ण माहिती घेणार असल्याचे पवार म्हणले. राज्याला आवश्यक लसीचा साठा केंद्राने द्यावा ही भूमिका आहेच.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in