एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कधी हा त्यांचा प्रश्न आहे  : शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंचा प्रवेश हा आता खडसेंचा प्रश्न आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
4Sharad_20Pawar_20_20Ekanath_20Khadse.jpg
4Sharad_20Pawar_20_20Ekanath_20Khadse.jpg

उस्मानाबाद : "भारतीय जनता पक्ष वाढविण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. पण भाजपकडून आपली नोंद घेतली जात नाही, असं एकनाथ खडसे यांना वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंचा प्रवेश हा आता खडसेंचा प्रश्न आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी प्रवेश करणार या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. 
 
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झाले होते. पण "मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही," असे एकनाथ खडसे यांनी काल स्पष्ट केले आहे. 
  
मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती खडसे यांनी काल 'सरकारनामा'शी बोलताना दिली. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. खडसे यांनी मात्र, राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

खडसे यांनी काल सांगितले की, मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. मी जे करतो ते कधीही लपवत नाही आणि रोखठोक करतो. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असता तर मी ते स्वतः जाहीरपणे सांगितले असते. असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझ्या प्रवेशाचे मुहूर्त मी कधीच जाहीर केले नाहीत. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत.असे जर काही असेल तर मी स्वतः जाहीरपणे बोलेन, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22) खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

खडसे यांनी काल (ता.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची  भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्याचवेळी त्यांच्या प्रवेशाचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत होते. खडसे यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही याला दुजोरा दिला होता.
 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com