शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन.. - Sharad Pawar congratulates Mamata Banerjee Assembly Election Result | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

तृणमूल २०७ जागांवर आघाडीवर आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लाट कायम आहे. त्या १५०० मतांनी आघाडीवर आहे. तृणमूल २०७ जागांवर आघाडीवर आहे. याबाबत राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करत ममता बॅनर्जींचं अभिनंदन केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ममता बॅनर्जीचे अभिनंदन केलं आहे.

तृणमूल काँग्रेसने चांगली आघाडी घेत भाजला मागे सोडले आहे. तृणमूल काँग्रेसने २०८ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो टॅालीगंज मतदार संघातून पराभवाच्या छायेत आहेत.
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी  केलं आहे. यावेळी त्यांनी जनतेच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही पवार म्हणाले.  शरद पवार यांनी याबाबक टि्वट केले आहे.  

कैलास विजयवर्गीय म्हणाले , हा पराभव आता पचत नाही! 

भाजपचे ज्येष्ट नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की बाबुल सुप्रियो यांचा पराभव पचत नाही. पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत. त्याचे विरोधी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अरुप बिश्वास यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 
 
हेही वाचा : दक्षिणेत लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मोदी फॅक्टर निष्प्रभ
  
चेन्नई : कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपला अद्यापही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही तमिळनाडू व केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्याचा काहीही परिणाम येथील मतदारांवर झाल्याचे दिसत नाही. मोदी फॅक्टर या निवडणुकीतही चालल्याचे दिसत नाही. तमिळनाडूमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डीएमके व काँग्रेस आघाडीला 38 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. अण्णाद्रमुकला 2014 मध्ये 37 जागांवर विजय मिळाला होता. 2019 च्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपशी आघाडी केली होती. त्याचाच फटका 2019 च्या निवडणुकीत बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. भाजपशी आघाडी केल्याने मुस्लिम व ख्रिश्चन मते अण्णाद्रमुकपासून दुरावल्याचा दावा त्यांनी केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख