आघाडी सरकारच्या संवेदना गोठलेल्या आहेत... 

रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दरेकर यांनी नुकतीच त्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
0Pravin_20Darekar_1.jpg
0Pravin_20Darekar_1.jpg

मुंबई : राज्यात सतत महिलांवर अत्याचाराच्या घटना घडूनही सरकारला अशा घटनांची नोंद घ्यावीशी वाटत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना गोठलेल्या आहेत व सरकारचा पोलिसांवरही धाक राहिलेला नाही, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दरेकर यांनी नुकतीच त्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भारतीय जनता पक्ष तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहील, तसेच या प्रकरणात न्याय व्हावा, यासाठी भाजपच्या वतीने चांगला वकील देण्यात येईल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते आदी उपस्थित होते.

राज्यात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे. महिलांना संरक्षण देण्यात सरकार कमी पडत आहे. सरकारने जनतेला आत्मविश्वास व धीर देण्याची आवश्यकता आहे, मात्र सरकार यातील काहीच करत नाही.

ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर व बाजारासाठी बाहेर जातात. पण आता अशा स्थितीत वाडया वस्त्यांवरील आपल्या मुलींना घरातून बाहेर पाठावयाचे का, असा प्रश्न त्यांच्या आई वडिलांना पडला आहे. याचा परिणाम त्या मुलींच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे या गंभीर प्रकरणांची सरकारने दखल घ्यावी व या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करावा. 

खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही दरेकर यांनी केली. दरेकर यांनी घटनास्थळालाही भेट दिली. बळी पडलेली ही दुर्दैवी मुलगी खेळाडू तसेच कराटेपटू होती. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त आरोपी सामील असावेत, असाही अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यादृष्टीने पोलिसांनी शोध घ्यावा, असेही दरेकर म्हणाले.
Edited  by : Mangesh Mahale 

हेही वाचा: गेहलोतांना मायावती सुप्रीम कोर्टात धडा शिकविणार... 

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय नाट्य कुठल्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचं ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती गेहलोत सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणार आहे. मायावती यांच्या बहुजन पक्षाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये गेले आहे.  आता याच मुद्यावरून मायावती या न्यायालयाची पायरी चढणार असल्याचे समजते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com