गरीबांची अशीही लूट; जनधन खात्यांवर दंडातून स्टेट बँकेची 300 कोटींची कमाई - SbI bank collects 300 crores from zero balance jandhan accounts | Politics Marathi News - Sarkarnama

गरीबांची अशीही लूट; जनधन खात्यांवर दंडातून स्टेट बँकेची 300 कोटींची कमाई

वृत्तसंस्था
सोमवार, 12 एप्रिल 2021

रिझर्व्ह बँक अॅाफ इंडियाच्या नियमांचे बँकांकडून उल्लंघन केले जात आहे. 

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून गरीबांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जनधन खाती उघडली जात आहेत. पण ही खाती बँकांसाठी कमाईचे साधन ठरत असल्याचे समोर आले आहे. जिरो बॅलन्स असलेल्या या खात्यांवरून महिन्याला चारपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी सुमारे 18 रुपये दंड आकाारला जात आहे. यातून दंडातून मागील पाच वर्षात स्टेट बँक अॅाफ इंडियासह इतर बँकांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट अॅाफ टेक्नॅालॅाजी (आयआयटी) ने केलेल्या अभ्यासातून हे वास्तव समोर आले आहे. मोदी सरकारकडून काही वर्षांपासून जनधन बँक खाते ही मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कोट्यवधी गरीबांची खाती विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडण्यात आली आहे. त्याला बेसिक सेविंग्ज बँक डिपॅाझिट अकाऊंट (बीएसबीडीए) असेही म्हणतात. ही शुन्य शिल्लक म्हणजे झिरो बॅलन्स खाती आहेत. पण या खात्यांवरून होणाऱ्या विविध व्यवहार व सेवांसाठी मोठा दंड आकारला जात आहे. 

या खात्यांमधून दर महिन्याला केवळ चार व्यवहार मोफत आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 15 ते 18 रुपये दंड आकारला जात आहे. त्यामध्ये डिजिटल व्यवहारांचाही समावेश आहे. स्टेट बँकेने 17 रुपये 70 पैसे दंड आकारून 2015 ते 2020 या पाच वर्षांच्या कालावधीत 12 हजार खातेधारकांकडून 300 कोटी रुपये कमावले आहेत. सर्वाधिक खातेधारक याच बँकेत आहेत, असे अभ्यासातून समोर आले आहे. 

पंजाब नॅशनल बँकेनेही 3 कोटी 9 लाख खात्यांमधून 9 कोटी 9 लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे बँकांकडून डिजिटल व्यवहारांवरही दंड आकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार करण्यापासून बँकाच मर्यादा आणत आहेत. 

रिझर्व्ह बँक अॅाफ इंडियाने व्हॅल्यु अॅडेड सेवांमध्ये महिन्यातील चारहून अधिक व्यवहारांचाही समावेश केला आहे. त्यानुसार बँकांना या सेवांवर शुल्क आकारता येत नाही. पण प्रत्यक्षा स्टेट बँकेस सर्व बँकांकडून चारहून अधिक व्यवहारांवर शुल्क आकारले जात असल्याचे समोर आल्याचे अभ्यासात म्हटले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख