महाडिकांच्या तीस वर्षाच्या सत्तेला सुरंग : सतेज पाटलांनी `गोकुळ` जिंकले - satej patil wins gokul election in Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महाडिकांच्या तीस वर्षाच्या सत्तेला सुरंग : सतेज पाटलांनी `गोकुळ` जिंकले

सुनील पाटील
मंगळवार, 4 मे 2021

महाडिकांना प्रमुख सत्तास्थांनावरून घालविले... 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत गेली तीस वर्षे असलेली महादेवराव महाडिकांची सत्ता उलथवून टाकण्यात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले आहे. सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जोडीने महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. सतेज पाटील यांच्या पॅनेलने 21 पैकी 17 जागा जिंकल्या तर महाडिकांच्या सत्ताधारी पॅनेलला केवळ 4  जागा मिळाल्या.

महाडिक यांचे या संघावर वर्चस्व होते तरी त्यांच्या कुटुंबातील कोणीही येथे संचालक आतापर्यंत नव्हते. मात्र शौमिका महाडिक या तिथे संचालिक म्हणून निवडून गेल्या आहेत.  त्यांच्या विजायासाठीही त्यांना झगडावे लागले. यातूनच सतेज पाटील यांचे कडवे आव्हान मोडून काढणे महाडिक यांना शक्य झाले नाही. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांचाही दारुण पराभव झाला. हा संघ मल्टिस्टेट करण्याचा महाडिक यांचा प्रयत्न पाटील यांना हाणून पाडला होता. तेव्हाच संघर्षाची मोठी ठिणगी पडली होती. त्या ठिणगीने महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लागला. राजू शेट्टींनी महाडिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. सतेज पाटील यांची राजर्षी शाहू शेतकरी आघाडी या नावाने पॅनेल होते तर महाडिक यांची राजर्षी शाहू आघाडी असे पॅनेल होते. 

माजी आमदार सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर (शेतकरी आघाडी)  शौमिका महाडिक (महाडिक पॅनेल) हे आधीच्या फेऱ्यांत राखीव गटांतून विजयी झाले.

सर्वसाधारण गटातून विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे 

डोंगळे अरुण गणपतराव - सातवी फेरी 1710- आठवी फेरी- 1957- नववी फेरी (अंतिम)- 1980 ( शेतकरी आघाडी)

नरके अजित शशिकांत- 1705 -आठवी फेरी- 1946- नववी फेरी- 1972 ) (शेतकरी)

तायशेटे अभिजीत प्रभाकर- 1698-1950-  1972 (शेतकरी आघाडी)

नविद हसन मुश्रीफ-1682- 1933- 1959 (शेतकरी)

पाटील चुयेकर शशिकांत आनंदराव- 1663- 1901- 1923 (शेतकरी)

पाटील आबाजी उर्फ विश्वासराव नारायण- 1653- 1888- 1912 (शेतकरी)

चौगले किसन बापूसो- 1630-1866- 1879 (शेतकरी)

पाटील रणजितसिंह कृष्णराव- 1617- 1849- 1872 (शेतकरी आघाडी)

ढेंगे नंदकुमार सखाराम- 1603- 1845- 1867 (शेतकरी आघाडी)

गायकवाड कर्णसिंह संजयसिंह- 1597- 1819- 1848 (शेतकरी आघाडी)

चौगले बाबासाहेब श्रीपती- 1568- 1790- 1814 (शेतकरी आघाडी)

घाटगे अंबरिषसिंह संजय- 1552- 1763- 1803 (राजर्षी शाहू आघाडी, महाडिक पॅनेल)

खाडे बाळासो उर्फ वसंत नानू- 1556- 1754- 1795 (राजर्षी शाहू आघाडी, महाडिक पॅनेल)

नरके चेतन अरुण- 1526- 1723- 1762 (राजर्षी शाहू आघाडी, महाडिक पॅनेल)

पाटील संभाजी रंगराव (एस. आर.)- 1486- 1699- 1721 (शेतकरी आघाडी)

पाटील प्रकाश रामचंद्र- 1480- 1691- 1709 

पराभूत

गुरबे विद्याधर बाबुराव- 1468- 1668- 1691

चौगुले महाबळेश्वर शंकर- 1451- 1661- 1686

मंडलिक विरेंद्र संजय- 1444- 1663- 1686

आपटे रविंद्र पांडुरंग- 1408- 1594- 1632

पाटील उदय निवासराव-1401- 1594- 1631

पाटील (मुरगूडकर) रणजितसिंह विश्वनाथराव- 1372- 1560- 1597

पाटील रणजीत बाजीराव- 1356- 1520- 1558

पाटील प्रतापसिंह शंकरराव (कावणेकर)- 1317- 1490- 1527

पाटील दिपक भरमू- 1317- 1479- 1530

कौलवकर पाटील रविश उदयसिंह- 1284- 1460- 1495

पाटील सत्यजीत सुरेश- 1274- 1440- 1476

हत्तरकी सदानंद राजकुमार- 1279-1431- 1468

चव्हाण प्रकाशराव भिमराव- 1264-1430- 1466

देसाई धनाजीराव रामचंद्र- 1263-1444- 1482

भाटळे राजाराम पांडुरंग-1265- 1427- 1463

देसाई धैर्यशिल बजरंग-1257-1428- 1466

बेनके शामराव गोपाळ-16- 17- 18

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख