मुंबई : "ईडीच्या चैाकशीला आम्ही घाबरत नाही. अजित पवारांना नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने काल सकाळी छापा टाकत कारवाई केली. या धाडसत्रामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की ईडी आता मोहेंजोदडो हडप्पा पर्यंत पोहोचले आहेत.
मी वाटच बघतोय मला नोटिस कधी येईल. अभिनेत्री कंगना राणावतने जे काय मुंबईला पाकिस्तान म्हटलं. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर भाजपने सहमती दिली की हे पाकिस्तान आहे तर कठोर कारवाई गरजेची आहे. ही चौकशी पूर्ण होऊ दे
मग मीच ईडीला 100जणांची लिस्ट पाठवीन तेव्हा बघतो कोण किती कारवाई करतो. ईडी आता जुनी थडगी उकरून काढत आहेत. ईडीच्या चैाकशी कोणी घाबरत नाही. कोण घाबरतयं ते कळलेचं. सुडाचं आणि बिनवुडाचं राजकारण फार काळ चालत नाही.
कोकाटे म्हणतात...पदवीधर विरुद्ध साखर कारखानदार अशी निवडणूक#Satara #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/1RVnfpODCW
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 25, 2020
"माझ्याकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे ईडी वाले येऊ शकतात.. त्यांना येऊ द्या.. आम्ही वाट पाहतो आहोत. सध्या देशात आणखी काही काम नसतील. लोक घोटाळे करून पळत आहेत. काही जणांच्या संपत्तीत अचानक वाढ होते.. पण, राज्यात काही लोकांवर ईडी दबाव टाकत आहे, त्यांना ते करू द्या. आज पत्ते तुम्ही पीसताय, पण डाव आम्ही उलटू," असे राऊत म्हणाले. ईडीने काल एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचं घर, मुलांचं घर, ऑफिस ही ठिकाणे असल्याचे समजते. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर सायंकाळी माध्यमांशी बोलताना आमदार सरनाईक यांनी सांगितले की, ईडीने आमच्यावर का छापे टाकले आहेत, हे मलाही माहीत नाही. या छापासत्रप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, या धाडसत्रामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती.
(Edited by : Mangesh Mahale)

