शरद पवार-मोदींची भेट राजकीय नाही! - Sanjay Raut Reaction on sharad pawar modi meeting | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार-मोदींची भेट राजकीय नाही!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

प्रत्येक भेटीत राजकारण असत असं नाही.

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. राऊत पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, '' शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची ही राजकीय भेट आहे असं मला  वाटत  नाही.  सहकार , कृषी  या विषयावर त्यांच्या भेटीत चर्चा  झाली असेल. शरद पवार हे राष्ट्राचे  प्रमुख  नेते आहेत.  जे सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये  महत्वाची भूमिका बजावतात ते पंतप्रधांना भेटत असतात.  प्रत्येक भेटीत राजकारण असत असं नाही.'' पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत मला माहित नसल्याचे राऊत यांनी सांगितलं.

संसदेचे पावसाळी अधिवेशन ता. १९ जुलैपासून सुरू होत आहे, याबाबत राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचा काय राग रंग आहे, ते पाहिल्यानंतर आमची राज्यसभेतील भूमिका ठरवू.  राज्यसभेच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होईलच.''

शरद पवार-मोदी भेटीवर चंद्रकांत पाटील यांचे भाष्य  
नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता. १७ जुलै) दिल्लीत भेटी झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात लगेच उमटायला सुरुवात झाली. या भेटीवर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाशिकमध्ये भाष्य केले आहे. अधिवेशनापूर्वी मोठे नेते एकत्र येऊन चर्चा करत असतात. त्याचप्रमाणे भारत-चीन सीमाप्रश्न, कृषी कायदे आणि नव्या सहकार मंत्रालयाबाबत चर्चा झाली, असा कयास या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी बोलताना काढला. 

ईडीकडून शिवसेनेच्या दोन नेत्यांची चैाकशी सुरु ; चंद्रकांतदादांचा गौप्यस्फोट
नाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांची वेगवेगळ्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सध्या चौकशी सुरू आहे. अजून शिवसेनेच्या दोन नेत्यांचीही चैाकशी सुरु असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख