राठोड म्हणतात... 'नो बॉलवरच माझी विकेट गेली'   

राठोड यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले आहे.
 Sanjay Rathore .jpg
Sanjay Rathore .jpg

यवतमाळ : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathore) अडचणीत आले होते. त्यावरुन मोठे राजकीय वादळ उठले होते. त्या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावर राठोड यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले आहे. (Sanjay Rathore said My wicket went to no ball)     

यवतमाळ येथील एका कार्यक्रमात बोलताना राठोड म्हणाले, नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी मीडिया ट्रायलचे ते शिकार झाले असल्याचेही राठोड यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वृत्तपत्राच्या छापील बातमीवर अजूनही सामान्यांचा विश्वास आहे. त्यामुळे ही विश्वासार्हता टिकून राहायली पाहिजे, असेही राठोड म्हणाले.

पूजा सोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी राठोड यांच्यावर आरोप केले होते. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळे समोर येईल, असे म्हटेल होते. आपली बदनामी केली जात असल्याचा आरोपही राठोड यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर भाजप नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. आता परत मला मंत्रीपद द्यायचे की नाही हा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मात्र, माझ्या समाजासाठी मी काम करत राहणार, असे राजीनामा देताना राठोड यांनी सांगितले होते.    

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com