भाजपमध्ये मोठे फेरबदल..प्रदेशाध्यक्षपदी संजय कुटेंची वर्णी लागणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवस दिल्ली दौऱ्यावर होते.
भाजपमध्ये मोठे फेरबदल..प्रदेशाध्यक्षपदी संजय कुटेंची वर्णी लागणार?
Sanjay Kute .jpg

नवी दिल्ली : भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत आहेत. या दिल्ली भेटीमध्ये महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरु असल्याचे समजते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे समर्थक बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार डॅा. संजय कुटे (Sanjay Kute) यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते. (Sanjay Kutes name in race of BJP state president)  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. मात्र, त्यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट मिळाली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी शहा यांची भेट घेतली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांना भेट मिळाली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलारही इच्छुक आहेत. मात्र, त्यांना फडणवीसांची सोबत मिळणार का हा प्रश्न आहे. संजय कुटे हे ओबीसी चेहरा आहेत. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विरोधात एल्गार केला आहे. त्यामुळे कुटे यांचे नाव फडणवीसांनी पुढे केल्याचे समजते. 

राज्यातील सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी ओबीसी नेत्यांना भाजप संघी देणार असल्याची शक्यता आहे. संजय कुटे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते.    

कुटे यांची प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यास ओबीसी नेते पंकजा मुंडे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. पंकजा यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर जाहिर नाराजी व्यक्त केली होती. बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी त्यांना मोठे पद देण्याचा शब्द पक्षाने दिला होता. मात्र, त्यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा येण्याची शक्यता आहे.  

Edited By - Amol Jaybhaye   

Related Stories

No stories found.