चंद्रकांत गुडेवारांची महिन्याच्या आत बदली; भाजप आमदाराच्या पत्राने केली कमाल!

भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. ते पत्र व्हायरल झाल्यानंतर खाडे यांच्यावर टीका झाली होती.
 sangli zilla parishad ceo chandrakant gudewar transferred
sangli zilla parishad ceo chandrakant gudewar transferred

पुणे: डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले चंद्रकांत गुडेवार यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली झाली आहे. त्यांच्या जागी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जितेंद्र दुडी हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्पात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांची गेल्या महिन्यात जळगावला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्याजागेवर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुड़ेवार यांनी रूजू झाल्या झाल्या कामाचा धडाका लावला होता. कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे ही माझी प्रायोरिटी आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून कारवाई सुरू केली होती. दोघांना निबंबित केले होते, त्यामुळे झेडपीत खळबळ माजली होती. राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे गुडेवार निर्णय घेत नाहीत, हे सर्वांना माहिती असल्याने त्यांना पहिल्या दिवसापासून अंतर्गत विरोध सुरू होता. त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू होते. भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. ते पत्र व्हायरल झाल्यानंतर खाडे यांच्यावर टीका झाली होती. या प्रकारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टीका केली होती, तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र शासनाने लोकप्रतिनिधींच्या मताला महत्व दिल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांची महिनाभराच्या आतच बदली केली.

अजितदादांनी पुण्यातील मर्जीतील अधिकारी बदलले  

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुण्यातील लाडक्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी केलेल्या सूचना मान्य झाल्या आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार पुण्यातील महत्त्वाच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने आज सायंकाळी जारी केले.

त्यात पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे बदली महत्त्वाची मानली जाते. त्यांना महापालिकेत येऊन काहीच महिने झाले होते. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरच त्यांची या पदावर बदली झाली होती. कोरोना संकटाच्या काळात आयुक्तांकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबाबत पालिकेचे कौतुक होत होते. त्यात सातत्य राखण्यासाठी गायकवाड यांची बदली होईल, असे कोणाला वाटत नव्हते. त्यात पुण्यात लॉकडाऊन पुन्हा सोमवारपासून लागू होत असल्याने आहे त्याच अधिकाऱ्यांकडे जबाबदारी राहण्याची शक्यता व्यक्त होती. तरी त्यांची बदली त्यांनी आधी सांभाळलेल्या साखर आयुक्त पदावर झाली आहे.

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. साखर आयुक्त असलेल्या सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विशेषाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. विद्यमान विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर हे येत्या 30 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर राव यांच्याकडेच हे पद जाणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले.  कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे.  

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com