सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह  - Sangli Superintendent of Police Suhel Sharma corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

सुहेल शर्मा यांनी होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील तर शिवसेनेचे आमदार अनिव बाबर हे कोरोना बाधित झाले आहेत. तर आता सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा याचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. 

सुहेल शर्मा यांना दोन दिवसापूर्वी कोरानाची लक्षणं दिसल्यानं त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॅाझिटिव्ह आली आहे. सुहेल शर्मा यांनी होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुंटुबियांकडून सांगण्यात आले. 

पुणे शहरात १७३६ नवे कोरोना रुग्ण 

पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.५) दिवसभरात ४ हजार ५० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या महिन्यात आज दुसऱ्यांदा दिवसभरातील नव्या रुग्णांचा चार हजारांचा आकडा ओलांडला गेला आहे. यामध्ये  पुणे शहरातील १ हजार ७३६ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ९४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९२५, नगरपालिका क्षेत्रात ३९०  आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ५८ रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये   पुणे शहरातील सर्वाधिक ३७ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १४, जिल्हा परिषद क्षेत्रातील १७, नगरपालिका  क्षेत्रातील ८ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही (ता. ४) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. ५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान, काल दिवसभरात ३ हजार ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ४५६, पिंपरी चिंचवडमधील ८२०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७०, नगरपालिका क्षेत्रातील १५२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ४५ जण आहेत.

पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना यावर काय उपाययोजना करता येतील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात आढावा घेतला. आधिकाऱ्यांबरोबरच राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौरांसोबत त्यांनी बैठक घेतली. पक्षाच्या वतीने शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत हेल्पलाइन सुरू करण्यात येणार  आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख