धक्कादायक : जादा बिलासाठी मृताला 'जिवंत' केलं!

इस्लामपूर येथील डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे.
1Corona_20Numbers_20Declining_20on_20Monday_20in_20Pune_20District.jpg
1Corona_20Numbers_20Declining_20on_20Monday_20in_20Pune_20District.jpg

सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार सांगलीच्या Sangli  इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर  Dr. Yogesh Watharkar याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. Dr. Yogesh Rangrao Watharkar arrested

डॉ. वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे.  या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई  सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले.

रुग्ण सायरा यांच्यावर नॉन कोविड उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला, ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. दोन दिवसांनी डॉ. वाठारकर यांनी नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचाराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना दहा मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. 

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.

सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअर मध्ये उपचारादरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे.  मृत्यु प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू आठ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, डॉक्टरांनी मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय ? ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टर विरोधात तक्रार केली आणि या प्रकरणी पाठपुरावा केला.  सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले. अन्  डॉ.  वाठारकर अलगद फसवणूकीच्या गुन्ह्यात अडकला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com