आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित! 

प्लेग ची साथ आहे या नावावर 1897 साली रँड ने जनतेवर भयानक अत्याचार केले.
  Sandeep Deshpande .jpg
Sandeep Deshpande .jpg

मुंबई : राज्यात कोरोना महामारीमुळे गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यातच राज्यातील मंदीरेही बंद आहेत. त्यामुळे ही धार्मिक स्थळे विशेषतः मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनादेखील आक्रमक झाली आहे. मंगळवारी (ता ३१ ऑगस्ट) देखील दहिहंडी साजरा करण्यावरुन ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये खटके उडाले होते. (MNS leader Sandeep Deshpande criticizes the state government) 

त्यामध्ये मनसेने अनेक ठिकाणी दहिहंडी साजरा केली होती. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  

संदीप देशपांडे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये देशपांडे म्हणाले की ''प्लेग ची साथ आहे या नावावर 1897 साली रँड ने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँड ला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित.'' असा टोला त्यांनी लगावला आहे.  

दरम्यान, या पुढच्या टप्प्यात कोरोनाच्या साथीची तीव्रता अधिक असल्याचे केंद्र सरकारच सांगत आहे. तेव्हा भाजप आणि त्याच्यासोबत मैत्रीसाठी पुढे येणारे उत्सवांच्या नावाने अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सणांचे नाव पुढे करून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा या पक्षांचा प्रयत्न आहे. त्यातून सरकारलाही बदनाम करण्याचा त्यांचा डाव आह, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com