संभाजीराजेंनी यासाठी मागितली मुख्यमंत्री ठाकरेंची वेळ

मराठा आरक्षणावर तोडगा न काढताच प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय
sambhajiraje-mmets-cm
sambhajiraje-mmets-cm

पुणे : मराठा आरक्षणाचा विचार न करता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याबद्दल आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रभागी असलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही मराठा विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याचे मत व्यक्त केले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी खासदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात संभाजीराजे यांनी म्हटले आहे की `कोविड'च्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. मात्र यावेळीदेखील शासनाने मराठा विद्यार्थ्यांची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेशाच्या अधिसंख्य ( Super Numerary ) जागा निर्माण करून उपाययोजना करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मी हा मार्ग सुचवला होता, मात्र अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

 
या पार्श्वभूमीवर सुपर न्युमररी जागा निर्माण करुन SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. या बैठकीत सुपर न्युमररी जागांबाबत कायदेशीर विशेषाधिकार वापरुन निर्णय घेण्याचा शासनाला असलेला अधिकार सुचवून त्याच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर चर्चा करु ; यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. समाजाची भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com