आता तुम्ही बोला, जबाबदारी स्वीकारा..संभाजीराजेंचे मराठा नेत्यांना आवाहन.. - sambhajiraje chhatrapati facebook post for maratha reservation  | Politics Marathi News - Sarkarnama

आता तुम्ही बोला, जबाबदारी स्वीकारा..संभाजीराजेंचे मराठा नेत्यांना आवाहन..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

संभाजीराजे यांनी  फेसबूक पोस्टमध्ये मराठा समाजातील लोकप्रतिनिधींना आवाहन केलं आहे.

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १६ जून रोजी मराठा मुक मोर्चाची हाक दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यांत ‘लाँग मार्च’च्या तयारीसाठीसुद्धा बैठका होत आहेत. "हा ‘लाँग मार्च’ सरकारला परवडणारा नसेल. हा ‘लाँग मार्च’ मुंबई विधान भवनावर चालून जाईल. मग बघतो कोण अडवतं ते, असे खुले आव्हान संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला काल दिले. आज त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर करीत मराठा समाजातील नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केलं आहे. sambhajiraje chhatrapati facebook post for maratha reservation

"समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा," असे आवाहन संभाजीराजे यांनी आपल्या  फेसबूक पोस्टमध्ये मराठा समाजातील लोकप्रतिनिधींना केलं आहे.  येत्या १६ जूनला दहा ते एक या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार आहे. आंदोलनात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत, अशी माहितीही त्यांनी काल सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत दिली.   
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली. त्यादिवशी पासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलने मोर्चे काढणे प्रत्येक नागरिकाचा किंवा समाजाचा अधिकार आहे. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थिती ची जाणीव करून देणे माझी जबाबदारी आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. 

मराठा समाजाने जी ताकत दाखवायची होती ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणे योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतनिधींना समाजाने मतदान देऊन निवडून दिले. आता खरी जबाबदारी त्यांची आहे. त्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणे महत्वाचे आहे. समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात कसलेही स्वारस्य (इंटरेस्ट) राहिले नाही. आजही लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोण म्हणत आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे. तर कोण म्हणत राज्याची. आम्ही म्हणतोय ही जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची आहे, असे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं
Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख