आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांची फेसबूक पोस्ट शेअर..शिवभक्तांना आवाहन.. 

"घरीच शिवराज्यभिषक सोहळा साजरा करा" असे आवाहान संभाजी राजेंनी केलं आहे.
0Sambhajiraje_20F.jpg
0Sambhajiraje_20F.jpg

कोल्हापूर :  मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे खासदार संभाजी राजे  Sambhaji Raje यांनी सांगितले होते.  "रायगडाकडे कूच करा," असा आदेश संभाजीराजेंनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच दिला होता. पण आता संभाजी राजेंनी शिवभक्तांना "घरीच शिवराज्यभिषक सोहळा साजरा करा" असे आवाहान केलं आहे. संभाजीराजेंनी याबाबत फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. Sambhaji Raje appeal to Shiva devotees regarding agitation

"दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी...! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन, " असे संभाजी राजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

संभाजी राजे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..
मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दिनांक ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा "शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात" साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या  परंपरेला खंड पडू  देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com