सदाभाऊ खोत राज्यपालांना सूचविणार बारा जणांची नाव.. - Sadabhau Khot, Founder President of Rayat Kranti Sanghatana will present a list of 12 people to the Governor. | Politics Marathi News - Sarkarnama

सदाभाऊ खोत राज्यपालांना सूचविणार बारा जणांची नाव..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सदाभाऊ खोत कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त आमदार कोण असावेत त्या 12 नावांची वैशिष्टपुर्ण यादी देखील सादर करणार आहेत. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भातही राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. 

मुंबई : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे आज सकाळी अकरा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. सदाभाऊ खोत कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त आमदार कोण असावेत त्या 12 नावांची वैशिष्टपुर्ण यादी देखील सादर करणार आहेत. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भातही राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. 
 
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 

सामाजिक कार्यकर्ते दिलिपराव आवळे आणि शिवाजी पाटील यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत न्यायालयात यापूर्वी याचिका केली आहे. यामध्ये राज्य सरकारने राज्यपालांना नवनियुक्त सदस्यांची शिफारस करताना गुणवंत, तज्ज्ञ, कला, सामाजिक, शिक्षण इ. क्षेत्रातील व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी केली होती. यामध्ये बुधवारी याचिकादारांकडून एक अर्ज दाखल करण्यात आला. यानुसार आठजणांच्या शिफारशीला याचिकादारांनी विरोध केला आहे. 

यामध्ये नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शेतकरी नेते राजू शेट्टी आदींचा समावेश आहे. येत्या दोन तीन दिवसांत या नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. न्या संभाजी शिंदे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांना विधान परिषदेत सदस्यत्व देताना प्राधान्याने सामाजिक, कला , शिक्षण इ. क्षेत्रातील गुणवंत व्यक्तीची शिफारस सरकारने करायला हवी. मात्र दरवेळेस अशा व्यक्तिंचा विचार न करता राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचा विचार केला जातो, असा आरोप याचिकेत केला आहे. यामध्ये अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, अनिरुद्ध वनकर आणि नितीन पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य आठजण राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशपाल भिंगे, खडसे, शिंदे, शेट्टी, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन, वनकर तर शिवसेनेकडून ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, पाटील, आणि विजय करंजकर यांची शिफारस करण्यात आली आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख