मनसुख हिरेन यांच्या तोंड्यात सचिन वाझेनेच कोंबले होते रूमाल ? 

कळवा रेल्वे स्थानकावर सचिन वाझेने रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जातं आहे.
1Sarkarnama_20Banner_20_202021_03_21T221944.237_0.jpg
1Sarkarnama_20Banner_20_202021_03_21T221944.237_0.jpg

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी नवीन खुलासे येत आहे. मनसुख यांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोडांत ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नसून निंलबित पोलिस निरिक्षक सचिन वाझेनेच कोबंल्याचं सांगितलं जात आहे.

कारण मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने  ठाणेला आला होता. त्यावेळी कळवा स्थानकावर त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जातं आहे.

NIAच्या तपासात कळवा स्थानक परिसरातले CCTV तपासले असता. वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालं आहे. CCTV अस्पष्ठ असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंग ही वाझेच्या कपड्यासारखाच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी केली होती.
 
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIAनं अटक केलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी NIA नं काल छापेमारी केली.या। वेळी NIAनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपञ आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवसास्थानाजवळ सापडलेली स्फोटके तसेच, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सुनील माने यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेतून सशस्त्र(एलए) विभागात बदली करण्यात आली होती. आता या विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

या आधी वाझेसोबत असलेला रियाझ काझी या एपीआयला देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेला मदत होती. निलंबित पोलिस विनायक शिंदेही एनआयएच्या कोठडीत आहे. त्यामुळे वाझेसोबत जे होते ते सर्वजण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणी माने यांना २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्यांनी मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. 

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com