राज्यपालांनी कंगनाची कान उघाडणी केली असती, तर आनंद झाला असता.. - Sachin Sawant's criticism of Governor Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांनी कंगनाची कान उघाडणी केली असती, तर आनंद झाला असता..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. राज्यपालांवर याबाबत दबाव होता का ? हा संदेह जनतेत आहे.  

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालावर टिका केली आहे. याबाबतचं टि्वट सावंत यांनी केलं आहे. कंगनानं राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन आपल्यावर शिवसेना आणि ठाकरे सरकार कसा अन्याय करते याचा पाढाही वाचला होता. मुंबई सोडण्याची घोषणा करेपर्यंत तिने शिवसेनेला लक्ष्य करणे सुरूच ठेवले होते. 

ट्‌विटमध्ये कंगना म्हटलं होते की मुंबई सोडण्याचा निर्णय मी घेत आहे याचे मला खूप दु:ख होत आहे. ती हिमाचल प्रदेशमधील आपल्या घरी परतली आहे. मुंबईला पीओकेशी तुलना केल्यानंतर मला शिव्याशाप देण्यात आले. मला लक्ष्य करण्यात आले. माझे घर पाडले त्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होते. या सर्व प्रकरणात मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. माझ्यावर जे आरोप होत आहेत. सतत जे हल्ले होत आहेत. त्याची मला भिती वाटत असल्याने शेवटी मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मनाला खूप दु:ख होत असल्याचेही तिने म्हटलं होतं 

संबंधित लेख