'ईडी' चलाई ले जुलम से भाजपा, जिगर मा तेरी पाप है!

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमधील अकरा नेत्यांची नावं जाहीर करून ते तुरूंगात जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Sachin Sawant slams BJP and Kirit Somaiya over ED
Sachin Sawant slams BJP and Kirit Somaiya over ED

मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने ईडीची नोटीस पाठवली जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमधील अकरा नेत्यांची नावं जाहीर करून ते तुरूंगात जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपसह सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sachin Sawant slams BJP and Kirit Somaiya over ED)

सावंत यांनी मंगळवारी एका हिंदी गाण्याचे विडंबन करत भाजपला टोला लगावला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केलं असून त्यामध्ये 'ईडी चलाई ले जुलम से #भाजपा, जिगर मा तेरी पाप है, न क़सूर न फ़तूर बिना, जुरम के हुज़ूर मार देई', असं म्हटलं आहे. विरोधकांना कोणताही चूक नसताना ईडी मागे लावत सतावले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. याला घआबरणार नसल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

सावंत यांनी सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'किरीट सोमय्या यांना ED, CBI च्या नावाने धमक्या द्यायची इतकी सवय झालीय की ते जवळच्यांनाही धमक्या देत असतील. आचाऱ्याने मीठ कमी टाकले- मीठाचे पैसे खाल्लेस, ED ची नोटीसच येईल तुला...मित्राला उशीर झाला-CBI ला तक्रारच करतो, कॉलनीतल्या मुलांचा बॉल लागला-तुम्ही दिवाळीपर्यंत जेलमध्ये जाणार...', असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. 

दरम्यान, परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी परब यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यानंतर सोमवारी ईडीने तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये परब यांच्या परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर परब यांच्यावरही वसुलीचे आरोप झाले होते. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच देशमुख यांच्या मनी लाँर्डिंग प्रकरणातही परब यांचा समावेश असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात शनिवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. 

त्यानंतर रविवारी परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. त्यांना 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी आरटीओतील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. तसेच अन्य दोन ठिकाणीही ईडीने छापे टाकून चौकशी सुरू केली. खरमाटे यांच्यावर बदली प्रकरणात वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com