तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपचेच ; भगवान रामाचाही अपमान : सावंत

हा तर महाराष्ट्रासह भगवान रामाचाही अपमान आहे, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे.
2kagna_sachin_sawant_0 - Copy.jpg
2kagna_sachin_sawant_0 - Copy.jpg

मुंबई : "पूर्वी ड्रग्ज घेणारी व्यक्ती मुंबईला पाकिस्तान म्हणते, महाराष्ट्राचा अपमान करतयं, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदीर म्हणतं तरीही भाजप तिचे समर्थन करते ? यामागील तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपचेच आहेत," असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. हा तर महाराष्ट्रासह भगवान रामाचाही अपमान आहे, असं मत सावंत यांनी व्यक्त केलं आहे. 

सचिन सावंत यांनी याबाबत टि्वट केलं आहे. यात त्यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिचं नाव न घेता भाजप व कंगनावर निशाणा साधला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकऱणात सध्या एनसीबी करीत आहेय यात दररोज नवीन खुलासे होत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने याबाबत सांगितलं होते की कंगना राणावत हिच्या ड्रग्जशी काही संबध आहे का याबाबत चैाकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत सावंत म्हणाले की काही व्हिडिओ समोर आले आहे आहेत यात कंगना स्वतः ड्रग्ज घेत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. जर असं असेल तर तिला ड्रग्जची कोण देत होत याची चैाकशी करावी. कंगना ही ड्रग्ज घेत असेल तर तिची एनसीबीनं तिची चैाकशी केली पाहिजे.  
 
सावंत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की काल भाजप संचालित एका चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने केले.  मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोहीभाजप ला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटरवर कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंगनाला सांगा विश्वास कायम ठेव. आम्ही या लढ्यात तिच्यासोबत आहोत.  या वादात आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने उडी घेतली आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय सहप्रमुख रामलाल यांनी कंगनाच्या बाजूनं टि्वट केलं आहे. याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. "असत्याच्या हातोड्याने सत्याचा पाया डळमळीत होत नाही' अशा शब्दांत या कारवाईचा संघाने निषेध केला आहे. रामलाल यांनी टीका करताना कोणाचे नाव घेतले नसले तरी कंगनाच्या बेकायदेशीर घरावर हातोडा पडल्यावर त्यांना हातोडाच आठवावा हे पुरेसे सूचक मानले जाते. 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते.  कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने काल विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 
 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com