भाजपच वसुलीबाज पक्ष : सावंतांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह सहा जणांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
भाजपच वसुलीबाज पक्ष : सावंतांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर
Sachin Sawant, Devendra Fadnavis .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांची जनआशिर्वाद यात्रा आज (ता. १९ ऑगस्ट) मुंबईत सुरु झाली. त्यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला हे वसुली सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (Congress spokesperson Sachin Sawant criticizes Devendra Fadnavis) 

या संदर्भात सावंत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''मोदी सरकारच्या दबावाने काही जणांना आरोप करायला लावून महावसुली महावसुली अशी बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणारा भाजपच वसुलीबाज सिध्द! भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह सहा जणांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.''

प्रकरण काय?

ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८ ऑगस्ट ) सापळा लावून रंगेहाथ पकडले. अध्यक्षांसह स्वीय सहायक, एक लिपिक व एक शिपाई अशा चौघांना अटक केली. त्यावरुन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

स्थायी समिती अध्यक्ष. नितीन लांडगे, त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे व शिपाई राजेंद्र शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन झाली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात नदी सुधार प्रकल्पावर सादरीकरण होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सादरीकरण संपवून लांडगे व अन्य पदाधिकारी त्यांच्या कक्षात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी पिंगळे यांना महापालिकेच्या वाहनतळ परिसरात लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यांना तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कक्षात आणून चौकशी सुरू केली. त्याच वेळी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी त्यांच्या दालनातून बाहेर पडले.

पिंगळे यांच्यासह तेथील अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. दरम्यान, अध्यक्ष लांडगे यांना बोलावून त्यांच्याकडेही चौकशी केली. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लांडगे, पिंगळे, खामकर व कांबळे यांना घेऊन अधिकारी पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेतून गेले. अँड लांडगे हे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पूत्र आहेत. त्यांचे भोसरीतील घर व जनसंपर्क कार्यालयाचीही एसीबीच्या दुसऱ्या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली.  
 Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in