प्रियांका अन् कंगनाला वेळ देणाऱ्या पंतप्रधान मोदींना संभाजीराजेंना भेटण्यासाठी वेळ नाही! - Sachin Sawant criticizes Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

प्रियांका अन् कंगनाला वेळ देणाऱ्या पंतप्रधान मोदींना संभाजीराजेंना भेटण्यासाठी वेळ नाही!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 25 मे 2021

महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही. 

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बोलताना मराठा आरक्षणविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यवक्त केली होती. मोदींना मी चारवेळा पत्रव्यव्हार केला, पण अद्यापही मला भेट मिळाली नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा : संतप्त आंदोलनकर्त्यांनी जयंत पाटलांचा पुतळा जाळला 

त्या संदर्भात सावंत यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. असा टोला सावंत यांनी लगावला आहे. 

''महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे'', असचे सावंत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : यास चक्रीवादळ 'अम्फान'लाही मागे टाकणार! तीव्रता वाढण्याची भीती

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

संभाजीराजेंना मोदींनी भेट काक दिली नाही यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देतांना म्हटेल की ''मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीमधील विषय आहे. त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणून भेटून उपयोग होणार नाही''.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख