बाटली आडवी केल्यानंतरच सरपंचाची निवड... - Rural Development Election of Sarpanch Deputy Sarpanch  Alcohol ban | Politics Marathi News - Sarkarnama

बाटली आडवी केल्यानंतरच सरपंचाची निवड...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

दारूबंदीचे आश्वासन दिल्यानंतरच सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. 

नांदेड : दारूमुळे अनेकांचे संसार उद्धस्त होत आहेत. त्यामुळे आधी गावात 'दारूबंद करा, नंतर सरपंच- उपसरपंच यांची निवड करा,' अशी आग्रही मागणी गावातील महिलांनी केली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासन यांच्या आश्वासनानंतर नायगाव येथे सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली.

'आधी दारु दुकान बंद नंतर सरपंच, उपसरपंच पदाची निवड करा,' असा पवित्रा घेत आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत परिसरातच ठिय्या आंदोलन केले. ही घटना काल धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथे घडली. तहसीलदार आणि पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. 

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील दीड हजार लोक संख्येच्या या गावात दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. शिवाय...शाळकरी मुलं ही दारुच्या आहारी जात असल्याने नायगावच्या 200 महिलांनी ग्रामपंचायतीत ठिय्या मांडला. दोन महिन्यापासून अनेक वेळा आंदोलन केले तरी प्रशासन दखल घेत नसल्याने काल ग्रामसभेच्या दिवशी 'आधी दारु बंदी नंतर सरपंच ,उपसरपंच निवड करा,' अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी करत ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

'त्या' ७१ सरपंचांबाबत होणार उद्या निर्णय
 
शिक्रापूर : तब्बल ७१ सरपंचांना निवडीपासून काही दिवस दूर ठेवायला लावणा-या शिक्रापूर सरपंच निवडीच्या आक्षेपावर आता जिल्हाधिकारी गुरुवारी (ता.११) सुनावणी घेणार असून शिक्रापूरकरांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच ता.१६ पर्यंत जिल्हाधिकारी शिक्रापूरसह तालुक्यातील सर्व ७१ सरपंच निवड प्रक्रीयेची तारीख जाहिर करतील.

शिक्रापूर सरपंच आरक्षणावरील आक्षेपामुळे संपूर्ण शिरुर तालुक्यातील ७१ सरपंच निवड प्रक्रीया स्थगित करण्यात आली असून उच्च न्यायालयाने जिल्हाधिका-यांना काल (ता.०८) दिलेल्या आदेशानुसार वरील निर्णय झाला. दरम्यान अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणावर शिक्रापूरातील रमेश थोरात व अन्य दोन नवनिर्वाचित सदस्यांना आक्षेप घेतल्याने तक्रारदारांची बाजु आता जिल्हाधिकारी गुरुवारी (ता.११) ऐकून घेवून शिक्रापूरसह इतर सर्व ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड प्रक्रीयेचे आदेश जारी करतील.  

शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामपंचायतीत बांदल गटाचे ७ तर विरोधी शिक्रापूर ग्रामविकास आघाडीचे माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, आबाराजे मांढरे-पाटील, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ यांच्या गटाचे ९ सदस्य निवडून आले. मात्र सरपंच बांदल गटाचे रमेश गडदे हे एकमेव सरपंच आरक्षणाचे सदस्य ठरले व तेच सरपंच होतील याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली होती. याच पार्श्वभूमिवर नवर्निवाचित सदस्य रमेश राघोबा थोरात, पुजा दिपक भुजबळ व मोहिनी संतोष मांढरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण निश्चितीनंतर याचिका दाखल केली व त्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

        

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख