फेकन्यूज टीआरपी प्रकरणात 30 हजार कोटी रूपयांचा घोटाळा... ? - Rs 30,000 crore scam in fake news TRP case ...? | Politics Marathi News - Sarkarnama

फेकन्यूज टीआरपी प्रकरणात 30 हजार कोटी रूपयांचा घोटाळा... ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

 मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात टीआरपीमध्ये कोट्यावधी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समजते.

मुंबई : फेक न्यूजच्या माध्यमातून टीआरपी वाढविणाऱ्या वृत्तवाहिन्याची माहिती काल मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात टीआरपीमध्ये कोट्यावधी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समजते. या प्रकरणाच काही वृत्तवाहिन्यांची नावेही समोर आली आहेत. 

या फेक न्यूजच्या टीआरपी प्रकरणात 30 हजार कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याची शंका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ी माहिती दिली असल्याने यांच्याकडे याप्रकरणाचे सबळ पुरावे आहेत. यातील सत्य लवकर समोर येईल. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, संताची भूमी आहे, इंथ असत्य फार काळ टिकत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
काही जण आता पुन्हा मुंबई पोलिसांना बदनाम करतील, त्यांच्यावर प्रतिहल्ला करतील, असे राऊत यांनी सांगितले. 

हेही वाचा : सहा महिन्याची प्रतीक्षा संपली, रविवारपासून लातूर-मुंबई रेल्वे !  
 लातूर : सहा महिन्यांपासून बंद असलेली लातूर-मुंबई रेल्वे आता रविवारपासून (ता. ११) सुरू होत आहे. आठवड्यातून चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाने नोटीफिकेशनही काढले आहे. ही रेल्वे सुरू होत असल्याने लातूरहून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लातूर-मुंबई रेल्वे बंद करण्यात आली होती. सहा महिन्यांपासून ही रेल्वे बंदच होती. केंद्र शासनाने गेल्या महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात देशात काही लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केल्या जात आहेत. त्यात आता लातूर-मुंबई ही रेल्वे सुरू होत आहे. 

ता. ११ आक्टोबरला मुंबईहून ही रेल्वे निघणार आहे. ता. १२ आक्टोबरला येथून ती मुंबईला जाणार आहे. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. आतापर्यंत ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस बिदरपर्यंत जात होती. पण, सध्या तरी ती बिदरपर्यंत जाणार नाही. केवळ मुंबई ते लातूर अशी धावणार आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबई, पुण्याचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात आता दसरा दिवाळी सण येत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख